Latest

धनंजय मुंडेंचा अपघात; उपचारासाठी मुंबईला रवाना

दिनेश चोरगे

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कामे आटपून घरी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने धनजंय मुंडे यांच्या कारला मंगळवारी रात्री अपघात झाला. परळीतील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला असून याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनीच प्रसारमाध्यमाद्वारे दिली आहे.

आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला परळी येथे मंगळवारी रात्री अपघात झाला. यामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या अपघातनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर मुंडे यांनी आपल्या या अपघाताची माहिती फेसबुकवर दिली आहे. अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील उपचारासाठी मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी लातूरहून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डोक्याला गमजा, अंगावर शाल पांघरून ते लातूरकडे रवाना झाले. तेथून ते मुंबईला पोहचतील. तेथे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केली.

    हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT