पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी ट्विटरवरून सत्ताधाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे. त्यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सत्ताधा-यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, "सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे चांगलच झोंबलेल दिसतंय."
MLA Amol Mitkari : "५० खोके एकदम ओके"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने शिवसेनेत बंड करुन भाजपाशी युती करत सरकार स्थापन केले. ते मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रातील सत्तांतर राजकीय नाटकाला पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटातील इतर आमदारांनी वेळोवेळी सांगितले आहे की, हे सामान्य आणि गरीब जनतेचं सरकार, जनतेसाठी शक्य असेल तेवढं करु. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत टोला मारला आहे, "सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे चांगलच झोंबलेल दिसतंय." म्हणतं धारेवर धरलं आहे.
MLA Amol Mitkari : 40 गरीब गोविंदांना मलई
याच्या अगोदर अमोल मिटकरी यांनी आणखी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. या ट्विटमध्ये ४० आमदारांचाही उल्लेख केला आहे. राज्यभरात दहीहंडी उत्सवात सुरु होती. काल (१९ ऑगस्ट) मागाठाण्यात प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आता आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आपण करू", दरम्यान अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत खोचक टोला मारला आहे. "देवेंद्र फडणवीस जे दहीहंडी कार्यक्रमात बोलले _"आम्ही मलाई गोरगरीबांपर्यंत पोहोचवू" — कदाचित ते सुरत व गुवाहाटीमध्ये बसून गलेलठ्ठ मलाई खाऊन टूम झालेल्या 40 गरीब गोविंदांना ठाण्यातून आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत. असं ट्विट करत त्यांनी #मलाईदारसरकार दिले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.