ओशन स्प्रिंग्ज (अमेरिका); पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये सुरु असेलेल्या पार्टीत एकाने अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जागीच ठार झाला असून ६ जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्टीमध्ये २०० हून अधिक लोक होते. ही घटना अमेरिकेच्या दक्षिण भागातील मेसिसिपी राज्याच्या ओशन स्प्रिंग या शहरात घडली आहे. या घटनेत ६ जण जखमी असून त्यांच्या स्थिती बाबत अद्याप काहीच सांगता येत नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. (Mississippi Shooting)
ओशन स्प्रिंगचे पोलिस कॅप्टन रायन लेमिरे यांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, गव्हर्नमेंट स्ट्रीटवरील द स्क्रॅच किचनमध्ये सात जणांना गोळ्या घातल्या गेल्या. मिसिसिपी रेस्टॉरंटमध्ये सिन्को डी मेयो पार्टी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे पोहोचली आणि त्याने अंधाधूंद गोळीबार सुरू केला. (Mississippi Shooting)
मृत तरुणाची ओळख पटली
पोलिस कॅप्टन रायन लेमिरे म्हणाले की, बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी ठार झालेल्या तरुणाचे नाव चेस हार्मन असे असून तो 19 वर्षांचा होता. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस संपूर्ण परिसरात हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
रेस्टॉरंटमध्ये २०० लोकांची होती उपस्थिती
पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती असेल तर ती ओशन स्प्रिंग्ज पोलीस विभागाशी शेअर करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, स्क्रॅच किचनच्या मालकाने सांगितले की, ज्यावेळी हल्लेखोर रेस्टॉरंटमध्ये घुसला आणि हल्ला केला, त्यावेळी आवारात सुमारे २०० लोक उपस्थित होते.
अधिक वाचा :