बाळापूर; पुढारी वृत्तसेवा
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील मदर तेरेसा इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका रहीसा बेगम व मतीन कामले यांची कन्या मिसबाह कामले यांनी बकर कसाब समाजातील पहिली डेंटिस्ट डॉक्टर बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
मिसबाह यांनी हिंगोली मधील आखाडा बाळापूर इथल्या मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. हिंगोलीतील त्यानंतर हेगडेवार स्मृति ऋग्नसेवा विद्यालय येथे बीडीएस चे शिक्षण पूर्ण करत 65 टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणी मिळवली. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बकर समाज हा शिक्षणामध्ये खूप मागे असून, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण जवळपास शून्य टक्के आहे. मिसबाह यांनी या समाजातून डॉक्टर होण्याचा पहिला मान मिळवला आहे.
हेही वाचा