Latest

आई कुठे काय करते : संजना-अनिरुद्धचे फोटो वायरल, अनिरुद्धने लिहिली खास पोस्ट

सोनाली जाधव

 पुढारी ऑनलाईन : आई कुठे काय करते या मालिकेत संजना आणि अनिरुद्ध दोघेही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. 'आई कुठे काय करते' ((Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. संजना आणि अनिरुद्ध या दोघांचीही निगेटिव्ह भूमिका असली तरी पडद्यामागे त्यांची चांगली मैत्री आहे.

रुपाली भोसले म्हणजेच संजनाच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी म्हणजेच अनिरुद्ध याने एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने संजनाचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच त्याने आपल्या इंस्टाग्राम वर संजना सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्ट मध्ये काय लिहिले पाहूया. संजना आणि अनिरुद्ध दोघेही सोशल मीडियावर खूप ॲक्टीव्ह असतात. छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ((Aai Kuthe Kay Karte) मालिकेत लगीनघाई सुरु झालीय. अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.

याच दरम्यान अनिरुद्धने संजनाला वाढदिवसाच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंदने रुपाली सोबतचा फोटो शेअर करत लिहिले, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रूपाली. तिचं आदर्श वाक्य (Her moto of life) Love yourself first …then you will be able to love others,आधी स्वतःवर प्रेम करा.. मग आपल्याला जगावर प्रेम करता येईल . That's so true… Respect yourself first , Take good care of yourself first , then you will be able to take care of others..And respect others.. And she carries herself so elegantly , and beautifully..Happy Birthday Rupali Actually , Normally लोकांचे वाढदिवस असतात पण रूपालीचा वाढमहिना असतो, birthmonth असतो, birthday नाही, पूर्ण डिसेंबर महिना, डिसेंबरच्या एक तारखेपासून 29 तारखेपर्यंत दररोज एक किंवा दोन केक ती कापते, असंख्य तिचे फॅन्स तिला महिनाभर केक पाठवत असतात, डिसेंबर महिन्यात जवळजवळ 40 केक's तिने कापले असतील. तिचा वाढदिवस आमच्या सेटवर कोणीच विसरू शकत नाही, महिनाभर ती सगळ्यांना त्याची आठवण करून देते, I think that is how one should live life, fullest, Life has to be celebrated all the time, You live once So LIVE king size , or according to Rupali , live life Queen Size… आनंद सिनेमा चा डायलॉग आठवतो " बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही." आणि हे रूपाली कडून शिकायला मिळतं, कामाच्या बाबतीत तेवढीच श्रद्धा, वेळेचे महत्व, आपलं काम कसं चांगलं होईल ह्याचा सतत विचार करत रहाणं. जवळजवळ पाचशे एपिसोड्स आम्ही एकत्र काम केलं, आणि असा एकही सीन तिच्याबरोबर चा कधीही Dull, किंवा ज्यात full energy नाही, असा कधीच गेला नाही, सतत ती scene चा विचार , कुठे जागा काढता येतील, तो सीन आणखीन इंटरेस्टिंग कसा करता येईल याचा विचार करते.

संजना है कॅरेक्टर फार सोपं नाही

बरं संजना है कॅरेक्टर फार सोपं नाहीये, पहिल्या एपिसोड पासून ते कधीच सोपं नव्हतंच, पण रुपालीने ते कॅरेक्टर खूपच वेगळ्या level नेऊन ठेवलं आहे. आणि दोघेही भिन्न स्वभावाच्या आहेत , कॅरेक्टर संजना आणि प्रत्यक्ष रुपाली. आज वाढदिवसाच्या रुपाली भोसले ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद, आयुष्याचा पुढचा प्रवास यशस्वी आणि सुखमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

rupali bhosle

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध आणि संजना यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आज ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. रुपाली भोसले हिला फॅन फॉलोइंग अधिक आहे. तिने कष्टातून हे स्थान मिळवले आहे. ती दिसायला सुंदर तर आहेच, पण त्याशिवाय दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

हेही वाचा ; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT