पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-पॅलेस्टाईन हमासने केलेल्या हल्ल्यामुळे दोन्ही भागात युद्धजन्य परिस्थिती सुरु आहे. जगभरातून या घटनेवर प्रतिक्रिया येत आहेत. पॉर्नस्टार मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोठे विधान केले आहे. X वरील पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आला आहे. शनिवारी सुरु झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे हा विषय चर्चेत आला आहे. हमासने केलेला हल्ला आणि इस्रायलने त्याला दिलेले सडेताेड प्रत्युत्तरात अवघ्या काही तासांमध्ये शेकडाे नागरिकांचे बळी गेले आहेत. पॉर्नस्टार मिया खलिफा ही मात्र पॅलेस्टाईनला समर्थन देत आहे. तिच्या म्हणण्यानुसार पॅलेस्टाईनवर अन्याय होत आहे, हे लवकरच सर्वांना समजेल.
मियाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, भूतकाळातील इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाबद्दल कल्पना आहे. जर तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पाहूनही पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही वर्णभेदाच्या चुकीच्या बाजूने आहात. इतिहास हे तुम्हाला वेळोवेळी दाखवून देईल. मियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या या विधानावरुन ती पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा