Latest

Mhada Paper Leak : म्हाडाचा पेपर सेट करणाराच निघाला अट्टल मवाली ! पुण्यात तिघांना अटक

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आज (दि.१२) रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन एजंट आरोपी बुलढाण्याचे तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील आरोपी आहे. (Mhada Paper Leak)

संतोष हरकळ, अंकुश हरकळ (दोघे रा.बुलढाणा), प्रितेश देशमुख (पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mhada Paper Leak : पेपर फुटी प्रकरणात एजंट

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पेपर फुटी प्रकरणात एजंट आहे तर देशमुख म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पेपर सेट करणारा अधिकारी आहे.

शनिवारी रात्री १० वाजता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रभर चौकशी केली. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. दुपारी शिवाजीनगर न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे.

दरम्यान यापूर्वी पुणे सायबर पोलिसांनी आरोग्य विभागातील गट क व ड या परीक्षेचे पेपर फुटला प्रकरणी कारवाई करत, मराठवाडा मुंबई येथील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर एजंटांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. आणि त्यातच आता म्हाडाच्या परीक्षेचा देखील पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

आरोग्य भरतीमधील पेपरफुटीवरून राज्यात वादंग माजले असतानाच आता म्हाडामधील नोकर भरतीसाठी होणारी परीक्षा मध्यरात्री रद्द झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी पोहोचले असतानाच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याचे ट्विट करून सांगितले आहे. आता ही परीक्षा जानेवारीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. परत एकदा क्षमा मागतो.

तत्पूर्वी, नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेणार्‍यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी म्हाडाच्या भरती परीक्षा ही पूर्व परीक्षा गृहीत धरण्यात येणार असून त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT