Latest

Mark Zuckerberg | मार्क झुकेरबर्ग यांच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलला, इंस्टाग्रामवर शेअर केला मुलीचा फोटो

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) यांच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलला आहे. झुकेरबर्ग यांची पत्नी डॉ. प्रिसिला चॅन (Dr Priscilla Chan) यांना कन्यारत्न झाले आहे. दोघांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचे उत्साहात स्वागत केले आहे. झुकरबर्ग यांनी त्यांची मुलगी ऑरेलिया चॅन झुकरबर्ग हिच्या आगमनाची गुड न्यूज सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांसोबत शेअर केली आहे.

झुकेरबर्ग यांनी नवजात बाळासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे की, "या जगात आपले स्वागत आहे, ऑरेलिया चॅन झुकरबर्ग! तू देवाचा आशीर्वाद आहेस." (Welcome to the world, Aurelia Chan Zuckerberg! You're such a little blessing) इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत झुकेरबर्ग त्यांच्या नवजात बाळाकडे बघत स्मितहास्य करताना दिसत आहेत. त्याच पोस्टमध्ये त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यात प्रिसिला यांनी ऑरेलियाला कुशीत घेतले आहे.

झुकेरबर्ग यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या पत्नीच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. झुकरबर्ग आणि चॅन यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना आधीच दोन मुली आहेत. एक पाच वर्षांची ऑगस्ट आणि दुसरी सात वर्षांची मॅक्सिमा अशी त्यांची नावे आहेत.

झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलीच्या आगमनाची पोस्ट शेअर केल्यापासून या पोस्टला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक कमेंट सेक्शनमध्ये या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT