#HappyB'day : जगाशी मैत्री करुन देणारा झुकेरबर्ग | पुढारी

#HappyB'day : जगाशी मैत्री करुन देणारा झुकेरबर्ग

मुंबई : पुढारी ऑनलाईन

स्मार्टफोन, इंटरनेट वापरणाऱ्या कोणाला फेसबुक माहिती नसेल असे होणारच नाही. फेसबुकने जगातील कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. सुरुवातीला मैत्रीपुरते मर्यादित असणाऱ्या फेसबुकने आपले मत, विचार मांडण्यासाठी वॉल उपलब्ध करुन दिली. फेसबुकवर येणारा प्रत्येकजण मनमोकळेपणाने व्यक्त होऊ लागला. जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या उच्चस्तरापासून ते सामन्य वर्गातील नागरिकात मैत्री फुलवण्याची संकल्पना सत्यात उतरवणाऱ्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गचा आज वाढदिवस. जगात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल नेटवर्किंग साईट म्हणून फेसबुकला ओळखले जाते. आज आपण अनेकजण फेसबुक वापरतो पण या फेसबुकची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? फेसबुकचा संस्थापक झुकेरबर्गच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवूयात फेसबुकची झुकेबर्ग आणि फेसबुकविषयीच्या खास गोष्टी….

फेसबुकच्या माध्यमातून जगाशी मैत्री करुन देणाऱ्या मार्क झुकेरबर्गचा जन्म १४ मे १८८४ ला न्यूयॉर्क येथे झाला. त्याचे वडील दंतरोग तज्ज्ञ तर आई मनोविकार तज्ज्ञ होती. माध्यमिक शाळेत शिकत असतानाच झुकेरबर्गने प्रोग्रॅमिंग शिकून घेतले होते. झुकरेबर्गला कंप्युटर प्रोग्रॅम तयार करण्यात आवड होती. त्यामधे संवादासाठी, खेळासाठीच्या प्रोग्रॅममध्ये विशेष प्रयत्न करत होता. आपल्या माध्यमिक शिक्षणात त्याने ग्रीक रोमन भाषेचा अभ्यास केला. 

माध्यमिक शिक्षणानंतर झुकेरबर्गला पुढच्या शिक्षणासाठी हॅम्पशायर येथील फिलिप्स एक्सेटर ॲकॅडमीत पाठवण्यात आले. तिथे त्याने विज्ञान आणि साहित्याच्या अभ्यासात अनेक पुरस्कार मिळवले. ॲकॅडमीकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले होते की, झुकेरबर्ग फ्रेंच, हिब्रू, लॅटिन आणि प्राचीन ग्रीक या भाषा वाचू आणि लिहू शकतो. इथल्या शिक्षणानंतर त्याने हॉर्वडर् विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी फेसबुकचा पाया रचला गेला.

झुकेरबर्गने आपल्या कॉलेज आणि विद्यापीठातील मित्रांसोबत मिळून फेसबुक सुरु केले. विद्यापीठातील हॉस्टेलच्या रुममधून ४ फेब्रुवारी २००४ ला फेसबुकची सुरुवात करण्यात आली. हॉट ऑर नॉट अशा प्रकारचा खेळ म्हणून विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ते बनवण्यात आले होते. त्यावेळी हॉर्वर्ड विद्यापीठापुरतेच फेसबुक मर्यादित होते. विद्यापीठातील समुहाने फेसबुकला दुसऱ्या लोकांपर्यंत पोहचवले आणि फेसबुक लोकांच्या पसंतीस उतरले. दहा वर्षांतच फेसबुक १ अब्ज लोकांपर्यंत पोहचले. त्यानंतर आजपर्यंत फेसबुकचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मार्क झुकेरबर्गला ओळखले जाते. 

झुकेरबर्गने २०१७ च्या नोव्हेंबर मध्ये त्याची संपत्ती ७४.२ बिलियन डॉलर इतकी सांगितली आहे. त्यापैकी मोठा भाग मानवता आणि समानतेसाठी देण्यात येतो. याबाबतची घोषणा त्याची पत्नी प्रेसिल्लाने २०१२ मध्ये लग्नानंतर केली होती. ३० नोव्हेंबर २०१५ ला प्रेसिल्लाने पहिल्या अपत्याला जन्म दिला. त्यावेळी झुकेरबर्ग आणि त्याच्या पत्नीने फेसबुकचे ९९% शेअर्स मुलाच्या नावावर केले होते.

२०१० पासून टाईम्सच्या जगातील श्रीमंत आणि प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत झुकेरबर्गने स्थान मिळवले आहे. त्याला पर्सन ऑफ द इयरदेखील देण्यात आले होते. मार्क झुकेरबर्ग जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. वयाच्या तिसाव्या वर्षीच तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये पोहचला.

गेल्यावर्षीपर्यंत फेसबुकची वाटचाल स्वप्नवत वाटावी अशीच होती. विद्यापीठात सुरु केलेल्या एका सोशल नेटवर्किंगने जगभर लोकप्रियता मिळवली. मात्र ही महिन्यांपूर्वी फेसबुकच्या डेटा लीक प्रकरणावरुन झुकेरबर्गने माफी मागावी लागली. या प्रकरणानंतर डिलिट फेसबुक अशी मोहिम चालवली गेली. मात्र, तरीही फेसबुकच्या सिस्टिममध्ये बदल करुन ते अधिक सुरक्षित करण्याचे आश्वासन झुकेरबर्गने दिले. या काळात चहूबाजूने आरोप होत असताना त्याने शांतपणे माफी मागून पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन असे म्हटले होते. इतक्या आरोपानंतरही फेसबुकने लोकांना विश्वास दिला यात झुकेरबर्गने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्याने मला पुन्हा एकदा संधी द्या अशी विनंतीही केली होती.

Back to top button