पुढारी ऑनलाईन डेस्क : शिकागोमध्ये दोघा मित्रांनी आपल्या भारतीय मित्राच्या लग्नात पोशाखाबाबतीत असलेला लिंगभेद मोडीत काढून चक्क भारतीय पोशाख परिधान करुन रॉयल एन्ट्री केली. तुम्हाला वाटलं असेल की, भारतीय पोशाख घातलं यात काय वेगळपणं आहे, पण, या दोघांनी चक्क साडी घातली होती. साडी घालून ते मित्राच्या लग्नात सहभागी झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.
दोन तरुण लग्नात साडी घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शिकागोमधील आहे. यामध्ये एक महिला आपल्या मित्राच्या लग्नाची तयारी करत असताना दोन तरुण साडी घालण्यासाठी मदत करत असल्याचे दिसत आहे. हे दोघेजण आपल्या मित्राच्या लग्नासाठी तयार होत आहेत. साडी आणखी खुलून दिसण्यासाठी त्यांनी टिकलीही लावली आहे. हा व्हिडीओ आहे मिशिगन अव्हेन्यू येथील आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, दोन मित्र आपल्या भारतीय मित्र-मैत्रिणीच्या लग्नासाठी साडी घालून एन्ट्री केली. वर हा पाठमोरा आहे. या वेळी वधू आली असावी, असा समज करत वर पाठीमागे पाहतो तर चक्क त्याचे मित्र साडी घालून आल्याचे त्याला दिसते. चौघांनाही हसू आवरत नाही. या व्हिडिओला ५५ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर ५ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
ज्या मित्रांनी साडी घातली होती. (Viral Video) त्यांच्यावर कंमेट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. बऱ्याच कमेंटस या लिंगभेद आणि पोषाख या संदर्भात आहेत. लिंगभेद आणि पोशाख या संदर्भात जे गैरसमज आहेत. त्या संदर्भात चर्चा सुरु आहे. तर काहींनी आपल्या मित्राच्या संस्कृतीचा आदर केल्याबद्दल साडी घालतेल्या दोघांचही कौतुक केलं आहे. तर काहींनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले की, "हे खूप भारी आहे. अगदी मनमोहक." दुसर्या एका युजरने कमेंट केली आहे की, "मुले अधिक सर्जनशील होत आहेत. तर आणखी एकजण म्हणाला, "हे माझ्या बाबतीतही अस व्हायला हवं".