urmila nimbalkar 
Latest

विषय गोल आहे ♥️ : उर्मिला निंबाळकर हिच्या बाळाचं सुपर फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध यु ट्यूबर उर्मिला निंबाळकर हिच्या बाळाची पहिली झलक तुम्ही पाहिली असेलचं. पण, जर पाहिली नसेल, आम्ही तिच्या बाळाच्या पहिल्या फोटोसह इतर काही सुंदर फोटो देत आहोत. तुम्हाला माहितीये का? उर्मिला निंबाळकर हिने आपल्या बाळाचे अप्रतिम फोटोशूट केले आहे. हे बेबी फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल, 'व्वा! क्या बात है'. तिने हे बेबी फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उर्मिलाने सोशल मीडियावर एकापेक्षा एक बाळाचे फोटो शेअर केले आहेत.

उर्मिलाने (urmila nimbalkar) काही दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. 'माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली', असं म्हणत तिने फोटो कॅप्शनही लिहिली होती. तेव्हा तिचे चाहते तिचे बाळ कसे आहे, हे पाहण्यासाटी उत्सुक होते. यानंतर तिने बाळाची झलक इन्स्टावर दाखवली होती.

सुपर बेबी फोटोशूट

उर्मिलाने सोशल मीडियावर बाळासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बाळाला कापडामध्ये गुंडाळलं आहे. तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय-'उर्मिला आणि एक गोंडस बाळ! बाळाबरोबरचा पहिला फोटो, मला कधी कधी विश्वासच बसत नाही, ही गुंडाळलेली अळी, हा एक बरीटो, माझा आहे.'

एका सोशल मीडिया युजरने तिला कमेंट दिली -'ताई पदार्थ घेताना आधीच वजन करुन घ्या, गालाचे वेगळे होतील…तिसऱ्या फोटोत तिच्या बाळाला डार्क ग्रीन कलरच्या टॉवेलमध्ये गुंडाळलं आहे. या फोटोला तिने कॅप्शन लिहिलीय की, 'लाडू खायचा का?'

या फोटोला भरभरून कमेंट्स येत आहेत. एका नेटकऱ्याने फोटोला कमेंट दिली आहे की, आई गं….मला हवा हा लाडू….गोंडू गं ते. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-जगातली सगळी सुखं एकीकडे❤️❤️❤️ आणि लेकराला डोळे भरून बघणे एकीकडे?. खुप खुप प्रेम❤️. आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलंय-गोड आईचा गोड गोड बाबु.

फोटोशूटचा एक व्हिडिओ देखील तिने शेअर केलाय. यामध्ये तिने कॅप्शन लिहिलीय-'ही आठवण आयुष्यभर राहिल!'
दुसऱ्या फोटोशूटला तिने My Hero ♥️ अशी कॅप्शन लिहित हार्ट इमोजी शेअर केलीय.

सुकिर्त गुमास्तेसोबत लग्न

उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्न केलं होतं. यावर्षी एप्रिल महिन्यात तिने गुड न्यूज दिली होती. तिने पतीसोबत फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. उर्मिला आणि सुकिर्त यांची एका थिएटर ग्रुपद्वारे पहिल्यांदा ओळख झाली. दोघांची चांगली मैत्री होती. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

उर्मिलाचा पुण्यातील ढेपेवाडा येथे राजेशाही थाटात डोहाळ जेवण झालं होतं. तिने या सोहळ्याचे काही फोटोदेखील शेअर केले होते. तिने ३ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT