Sayali Sanjeev  
Latest

Sayali Sanjeev : मधुर हास्य जणू शुक्राचे चांदणे❤️; सायलीच्या कुरळ्या केसांवर चाहते फिदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन न्यूज : बोल्ड आणि ब्यूटिफूल मराठी अभिनेत्री सायली संजीवचा ( Sayali Sanjeev) 'हर हर महादेव' हा मराठी चित्रपट गाजला आहे. या चित्रपटात सायलीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पती सईबाईची भूमिका उत्तम आणि रंजक पद्धतीने साकारली आहे. यात एका शुरवीराच्या पत्नीला कशा प्रकारचा संघर्ष करावा लागतो हे दाखवण्यात आलं आहे. याचदरम्यान सायली चित्रपटाच्या प्रमोशन असो वा आणखी कोणतेही फॅक्शन असो तिचे नवनवीन हटके लूक समोर येत आहे. आताही तिचा आणखी एका लूक व्हायरल झाला असून यात तिच्या हास्याचे चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

मराठी अभिनेत्री सायली संजीवने ( Sayali Sanjeev) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पांढ्या रंगाच्या चुडीदारमधील फोटो शेअर केले आहेत त्यात ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. कुरळ्या- मोकळे केसांची स्टाईल, गळ्यात नेकलेस, हातात अंगठी, कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे. यातील खास म्हणजे, सायलीच्या मनमोहक हास्याचे चाहते दिवाने झाले आहेत. या फोटोला सायलीने एका हार्टवाला ईमोजीसह 'Styled by my love' असे कॅप्शन लिहिले आहे. हा ड्रेस सायलीवर खूपच सुंदर दिसत असून तिच्या पाठीमागे 'चला हवा येउ द्या' या शोचा सुंदर असा सेट दिसतोय.

सायलीच्या या फोटोंचे चाहत्यांकडून भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Beautiful ❤️', 'Supper Beautiful❤', 'मधुर हास्य ❤️धमाल?', 'Looking so beautiful ?', 'Beautiful ❤️', 'Beautiful Angel ??❤️❤️??', 'Lady in white ❤️', '❤️अतिशय सुंदर❤️', 'Gorgeous ❤️', 'Sundari with Sundaar heart ❤️', 'Wow❤️', '❤️ ??gorgeous ??❤️', 'Butterfly ?', 'Sundar❤️', 'Crush❤️❤️', '❤️❤️ VERY NICE LOOKING ❤️❤️', 'So cute', 'खूप छान', 'tabyet sudhrili ahe ani khup sunder dista ahat❤️❤️??', '❤️Prem❤️', 'Looking beautiful and cute sayali?❤️', 'Prettyy❤️', 'चला हवा येउद्या ❤ WHITE ?? Princess …khup sunder', 'Morning Beauty ❤️ ?', 'Very nice dream girl ❤️❤️❤️', 'Uff..❤️❤️', 'U looking soooooo gorgeous..❤️❤️?', 'wow very nice… ?', 'Beautiful Angel ??❤️❤️??'. यासारख्या अनेर कमेंट्स केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट, लव्हली आणि फायरचे ईमोंजीनी कमेंट्स सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. तर सायलीचा सोशल मीडियावर खूपच मोठा चाहता वर्ग आहे. 'हर हर महादेव' या चित्रपटात सायलीसोबत सुबोध भावे, शरद केलकर, अमृता खानविलकर, मोहन जोशी, शरद पेंडसे आणि मिलिंद शिंदे या कलाकरांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT