gautami deshpande 
Latest

Gautami Deshpande : मृण्मयीच्या बहिणीचा अंदाजच वेगळा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'माझा होशील ना' फेम मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande) ने करड्या रंगाच्या साडीत एकापेक्षा एक फोटोशूट करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. (Gautami Deshpande) सध्या तिने स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये फोटोशूट करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांनी कॉमेंटसचा पाऊस पडला आहे. तुम्हाला माहिती आहे का, गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची लहान बहीण आहे. माझा होशील ना या मालिकेतून तिने आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केलीय.

छोट्या पडद्यावर 'माझा होशील ना' या मालिकेतून गौतमी चाहत्याच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेत तिने 'सई' नावाची उत्तम भूमिका साकारली आहे. गौतमीसोबत या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी दिसला आहे. उत्तम अभिनयसोबत ती चांगली डान्सरदेखील आहे.

दरम्यान, Shashank Sane या इन्स्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रिंटेड करड्या रंगाच्या साडीत दिसते. लाईट मेकअप आणि शोभतील असे दागिने तिने घातले असून मोकळे केस सोडले आहेत. तिच्या प्रत्येक अदा पाहण्यासारख्या तर आहेच, शिवाय तिच्या चेहऱ्यावर निरागस भाव दिसताहेत.

कोण आहे गौतमी?

गौतमी ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान बहीण आहे. तिचा जन्म ५ जानेवारी, १९९२ रोजी पुण्यात झाला. पुणे विद्यापीठातून २०१४ मध्ये तिने अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले आहे. दरम्यान, महाविद्यालयीन काळात गौतमी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायची. तिने अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता. तसेच अनेक पुरस्कारही जिंकले होते. ती उत्तम गातेही. माझा होशील ना या मालिकेपूर्वी ती सारे तुझ्याचसाठी या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने श्रुतीची भूमिका साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT