नाते
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाकरीता गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रभर आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवले आहे. आपल्या महाराष्ट्रव्यापी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्यामध्ये मराठा समाज गाठी भेट दौऱ्याअंतर्गत दिनांक 19 नोव्हेंबर रोजी ते रायगडाला भेट देणार आहेत. हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी जरांगे पाटील येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
संबंधित बातम्या –
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेपर्यंत ते किल्ले रायगडावर उपस्थित राहणार असून दुपारी तीन वाजता महाडमध्ये भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाड व परिसरातील मराठा समाजाच्या प्रमुख मान्यवरांशी यासंदर्भात संपर्क साधण्यात येत असून किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव या दिवशी उपस्थित राहतील याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.