महाड कंपनीत स्फोट कामगार मृत्यू प्रकरण : ब्ल्यू जेट कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा | पुढारी

महाड कंपनीत स्फोट कामगार मृत्यू प्रकरण : ब्ल्यू जेट कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

महाड : पुढारी वृत्तसेवा – महाड एमआयडीसीतील ब्लू जेट कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की, या आगीमुळे कंपनीमध्ये एकामागे एक स्फोट व्हायला सुरुवात झाली. या भीषण आगीमध्ये सुरुवातीला सात कामगार जखमी झाले होते तर अकरा कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. घटना एवढी भीषण होती की या घटनेचा रेस्क्यू करण्यासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करावे लागले. अखेर तीन दिवसानंतर अकरा मृत्यू देह संपूर्ण होरपळलेल्या अवस्थेमध्ये सापडले. यामध्ये जीवनकुमार चौघे, अभिमन्यू ऊराव, विकास महातो, शेषराव भुसारे, अक्षय सुतार, सोमीनाथ विधाते, विशाल कोळी, संजय पवार, असलम शेख, सतीश साळुंखे, आदित्य मोरे अशी मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची नावे असून इतर सात कामगार जखमी झाले होते.

महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार संघटनेने कंपनी प्रशासनावर गंभीर गुन्हा दाखल व्हावा, याकरीता लेखी निवेदन दिले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कंपनी व कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कंपनीच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून अन्य संबंधित अधिकाऱ्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांची टीम या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Back to top button