file photo 
Latest

शिंदे-फडणवीस यांनी एकदाच यावे चर्चेची दारे खुली : मनोज जरांगे-पाटील

backup backup

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मला दवाखान्यात नेल्याची अफवा पसरवली गेली आहे. ही अफवा ऐकू नका. मी अंतरवालीतच आहे. मला घेऊन जाणाऱ्याला मी झटका दाखवीन. मला सरकारने नेल्यास मीही झटका दाखवीन. सरकारमध्ये तशी ताकद नाही. बीडमध्ये बस पेटवली. समाज शांततेत आंदोलन करत आहे. उद्रेकाला आपलं समर्थन नाही. मराठा आंदोलन बदनाम करण्याची कुणीतरी सुपारी घेतली. सामंजस्य म्हणजे काय हे मला सांगा. मी जातीची फसवणूक करणार नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकदाच यावे तुम्हाला चर्चेची दारे खुली आहेत, असे मराठा आंदोलक मनोज जरांग पाटील म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जरांगे पाटलांची टीका

तुम्ही तुमची जात बदलू शकत नाही, तशी आम्हीही जात बदलू शकत नाही. बरळल्यासारखे बोलू नका. तुम्हाला कोणाला टोमणा लगावायचा आहे, ते आम्हाला माहीत नाही. आम्ही तुमच्यात जात बघितली नाही, तुम्ही बोलताना चुकता, चूक तुम्ही करता म्हणून लोक तुम्हाला टार्गेट करतात. तुम्ही एकही पोलीस बडतर्फ केला नाही. समितीची बैठक रद्द करून अधिवेशन बोलवा. आरक्षण द्या, मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही काम करणार नसाल तर लोक तुम्हाला नावच ठेवतील, अशी प्रतिक्रिया जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली.

सरकार म्हणते ती सामंजस्याची भूमिका म्हणजे काय.? आणखी काय करायची ईच्छा आहे. पुरावे कुठेही जमा करा. आरक्षण महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना द्या. पुरावे कुठेही सापडो आरक्षण सरसकट हवं अर्धवट आरक्षण घेणार नाही. सगळ्या समाजाला अर्धवट आरक्षण दिलं का? मग आम्हाला अर्धवट का? विभागा विभागात भेदभाव करून आतापर्यंत आरक्षण दिलं. सोमवारी बैठक आहे. ते आपल्याला हे कळू देत नाही. आमचा जीव घेऊन अधिवेशन घेता का? 10 हजार पुरावे खूप झाले, फक्त मराठवाड्यात आरक्षण नको महाराष्ट्र भर  आरक्षण हवं आहे. आम्हाला शहानपणा शिकवू नका, असा घणाघात मनोज जरांगे यांनी सरकारवर केला.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT