Electricity Supply in Navi Mumbai : उद्या पहाटेपासून नवी मुंबईतील वीज पुरवठा बंद राहणार | पुढारी

Electricity Supply in Navi Mumbai : उद्या पहाटेपासून नवी मुंबईतील वीज पुरवठा बंद राहणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कळवा खारेगाव येथे रविवारी (दि. २९) पहाटेपासून वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापारेषण कडून देण्यात आली आहे. कळवा येथील खारेगाव लाईनचे काम सुरु असल्याने हा वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे.  महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

रविवारी (दि. २९) महापारेषण कंपनीची ४०० केव्ही कळवा खारेगाव लाइनची उंची वाढवण्याचे काम होणार आहे. हे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे ऐरोली- काटई महामार्गाचे काम, ऐरोलीमधील युरो स्कूलसमोरील फ्लायओव्हरचे काम अपूर्ण आहे. या कामामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हे काम करण्याचे महापारेषणने रविवार, २९ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित केले आहे. हे काम पहाटे ५ वाजेपासून सुरू होणार असून, दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे या कालावधीत ऐरोली गाव, ऐरोली भक्ती पार्क, ऐरोली नाका, साईनाथवाडी, नेव्हागार्डन, शिव कॉलनी, समतानगर या ठिकाणचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. ऐरोलीमधील इतर ठिकाणचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्था करून चालू केला जाईल, असे कार्यकारी अभियंता मोहोड यांनी सांगितले.

Back to top button