पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने हिंसाचार सुरू आहे. केंद्र आणि राज्यसरकारकडून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, शांतता स्थापित होण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे. मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्याती शनिवारी रात्री पुन्हा कुकी समुदायातील लोकांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन मेईतेईच्या स्वयंसेवकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
निंगोमबम इबोमचा (34) लीकाई के इबोटोन, हाओबाम इबोचा (41) चिंग्या और नाओरेम राकेश (26) चिंग्या, अशी मयत मेईतेईंची नावे असल्याची माहिती आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, ही घटना बिष्णुपूर जिल्ह्यातील खुम्बी थाना अंतर्गत लींगंगताबी पोलिस आउट पोस्टजवळील लिंगंगताबी आवासीय विद्यालयात घडली. शनिवारी रात्री उशिरा 12.30 वाजता उत्तर पश्चिम दिशेने गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यानंतर पहाटे 02:20 च्या सुमारास डम्पी हिल भागातील अज्ञात सशस्त्र हल्लेखोर, संशयित कुकी बंडखोरांनी तेथे तैनात असलेल्या व्हीडीएफ/पोलिस कमांडोच्या दिशेने गोळीबार सुरू केला. VDF/पोलीस कमांडोनी याला प्रत्युत्तर दिले. VDF/पोलिस कमांडो आणि संशयित कुकी बंडखोरांमध्ये रात्रभर गोळीबार सुरू होता. Manipur Violence
माहितीनुसार, गोळीबार दरम्यान मेईतेई स्वयंसेवक जे खोइनुमंतबी चिंगथकमध्ये बंकरमध्ये पोजिशन घेत होते. त्यावेळी त्यांना कुकी बंडखोरांकडून गोळीबारीचा सामना करावा लागला. गोळीबारानंतर खोइजुमंतबी चिंगथक बंकरमध्ये तिघे मेईताई स्वयंसेवक मृतावस्थेत सापडले. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सेना, पोलिस आणि सुरक्षादलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
हे ही वाचा :