५ खुनानंतर सनकी पतीने जीवन संपवले 
Latest

पुणे हादरले : पत्नी, दोन मुलांना ठार मारून डॉक्टरने संपवले जीवन

अमृता चौगुले

खोर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पत्नीच्या त्रासाला कंटाळून वरवंड (ता.दौंड) येथे पत्नी व आपल्या दोन मुलांचा खून करून एकाने जीवन संपवल्याची घडली आहे.या बाबत माहिती अशी की, वरवंड येथील गंगासगर पार्कमध्ये रूम नंबर २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली आहे. डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ ) आणि पत्नी पल्लवी (वय ३५) यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी सापडले. मुलगा अद्वित अतुल दिवेकर (वय ११ ), मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय ७ ) यांना विहिरीमध्ये ढकलून जीवे मारले आहे. ज्या विहिरीमध्ये मुले ढकलून दिली आहेत, ती विहीर जवळपास १० परस इतकी खोल असून ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुले वर काढण्यात मोठी अडचण येत आहे. ग्रामस्थांकडून मुले बाहेर काढण्याचे मदत कार्य चालू आहे.

या घटनेने वरवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, दत्तात्रय टकले, हनुमंत भगत करीत आहेत. डॉ.अतुल दिवेकर हे व्यवसायाने गुरांचे डॉक्टर म्हणून काम पाहत होते, तर पत्नी पल्लवी दिवेकर या श्री गोपीनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होत्या.

………….म्हणून कुटुंब संपवले

डॉ.अतुल दिवेकर यांनी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत मी माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून तिला मारून टाकले असून माझा एक मुलगा व एक मुलगी गणेशवाडी (ता.दौंड) येथील जगताप विहिरीमध्ये मारून टाकले असून मी स्वतः जीवन संपवत आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT