Latest

Hit And Run : दुचाकीला धडक देऊन छतावर पडलेल्या मृतदेहासह ३ किमी धावली कार (VIDEO)

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीने नुकताच एक भयानक आणि थरारक अपघात अनुभवला. हा अपघात जितका भयानक होता तितकाच तो क्रूर आणि अमानवी होता असेच म्हणावे लागेल. हा अपघात दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग ते टॉलस्टॉय मार्गावर ३० एप्रिल रोजी घडला. भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील दोन युवकांपैकी एक युवक रस्त्यावर पडला व दुसरा युवक वाहनाच्या छतावर पडला. कारच्या छतावर पडलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. कार चालकाने अपघातानंतर वाहन न थांबवता तसेच छतावर पडलेला युवकाच्या मृतदेहासह तब्बल ३ किलोमीटर पर्यंत कार पळवली. (Hit And Run)

ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिली आणि या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने युवकाचा मृतदेह छतावरुन घेऊन जाणाऱ्या त्या कारचा पाठलाग सुद्धा केला. त्या वाहन चालकाने युवकाचा मृतदेह इंडिया गेट जवळ टाकला व तो फरार झाला. त्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने पोलिसांना फोन केला व या घटनेची सविस्तर माहिती सांगितली. (Hit And Run)

दुचाकीवरील दुसऱ्या तरुणाची प्रकृती चिंताजनक (Hit And Run)

या अपघातात दीपांशू वर्मा (वय ३०) याचा मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ मुकुल गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून हरनीत सिंग चावला या संशयिताला अटक करण्यात आली आहे. कारमध्ये त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. दीपांशु वर्मा दागिन्यांचे दुकान चालवत असे आणि तो एकुलता एक मुलगा होता.

प्रत्यक्षदर्शीने कारचा केला पाठलाग 

दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग आणि टॉलस्टॉय मार्गाच्या चौकात एका एसयूव्ही कारने दुचाकीस्वार दोघांना धडक दिली. अपघातानंतर दीपांशु वर्मा हा कारच्या छतावरून जावून पडला. वाहनाच्या छतावर युवक पडूनही ती कार थांबली नाही. कारने दीपांशूचा मृतदेह छतावर घेऊन ३ किलोमीटरपर्यंत नेला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी त्याच्या स्कूटरवरून कारचा पाठलाग करत गेला आणि त्याने दीपांशूचा मृतदेह कारच्या छतावर पडल्याचा व्हिडिओ बनवला. प्रत्यक्षदर्शींनी हॉर्न वाजवून आणि आरडाओरड करून चालकाला सावध करण्याचा प्रयत्न करूनही गाडी थांबली नाही. सुमारे तीन किमी नॉन-स्टॉप गाडी चालवल्यानंतर आरोपींनी दीपांशूचा मृतदेह इंडिया गेटजवळ फेकून दिला आणि पळ काढला.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सनलाइट कॉलनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालवणे आणि जीव धोक्यात घालणे या आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भीतीपोटी चालकाने कार थांबवली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT