पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई | पुढारी

पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील मोगलपूरा येथील लाभार्थ्याकडून पंतप्रधान घरकुल योजनेतील नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या घरकुलांची कामे करणार्या ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याने पहिल्या हप्त्याचा धनादेश प्राप्त करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागि तली होती याच परिसरातील एका तांदळा च्या दुकानामध्ये १७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या नाशिकच्या लाचलुच प्रतिबंधक विभागा च्या पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले.

केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरिबांना घरकुल देण्याची योजना सुरू आहे संगमनेर नगरपालिके अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी घरकुल योजनेचे कामे सुरू आहे त्यासाठी शास नाच्या वतीने दिलेल्या एजन्सीच्या मार्फत ठेकेदाराची नेमणूक केली आहे अन त्या ठेकेदाराकडून विकास जोंधळे या योजने च्या कामकाजासाठी कोकणगाव येथील काच जोंधळे या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.

संगमनेर शहरातील मोगलपूरा भागात एका लाभार्थ्याने घरकूलासाठी विकास जोंधळे या अधिकाऱ्याकडे अर्ज दिला होता तो मंजूर होवून आला आहे अनुदा नाच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश लाभा र्थ्याला देण्यासाठी विकास जोंधळे याने तक्रारदाराकडे१७हजार रुपयांच्यालाचेची मागणी केली होती.त्यानुसार तक्रारदाराने या अधिकाऱ्याच्या संदर्भात नाशिकलाच लोक प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यां कडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार मंगळवारी सायंकाळी मोगलपूर्‍यातील एका तांदळाच्या दुकानात लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभा गाचे पोलीस निरीक्षक संदीपसाळुंखेयांनी आपल्या पथकासह संगमनेरात येवूनमोग लपूर्‍यात सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे लाचखोर विकास सुरेश जोंधळे रा.कोकणगाव, ता.संगमनेर) तेथे आला आणि त्याने तक्रारदाराकडून १७ हजार रुपयाची लाच स्वीकारली. त्याचवेळी आसपास दबा धरुन बसलेल्या एसीबी च्या पथकातील पो.नि.साळुंखे यांच्यासह हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने झडप घालीत त्याला रंगेहात पकडले याबाबत रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button