पुढारी ऑनलाईन डेस्क :
एका देशाच्या विस्तारवादी भूमिकेमुळे दुसरा देश युध्दाच्या खाईट लोटला जातो. मात्र युध्दखाेर देशातील सैनिकही शेवटी मानवच असतात. त्याचेही कुटुंब असतं, घरात आईवडील आणि मुलं असतात. त्यांनाही शत्रुराष्ट्रामधील सर्वसामान नागरिकांची काळजी असते. मात्र सैनिक म्हणून आदेशाचे पालन करत त्यांना आपलं कर्तव्य बजावावेच लागते. याचीच माहिती देणारा एक मेसेज रशियन सैनिकाने आपल्या आईला केला. दुर्दैवाने तो मेसेज अखेरचा ठरला. हा रशियन सैनिक युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात ठार झाला आहे. मात्र शत्रुराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांची अप्रत्यक्ष काळजी वाटणार्या हा मेसेज युक्रेनच्या राजदुतांनी युनाेतील आपत्तकालीन बैठकीत वाचून दाखवला. आहे. ( Russian soldier's message )
सहाव्या दिवशीही रशिया-युक्रेन युध्द सुरुच राहिले आहे. दिवसोंदिवस त्याची तीव्रता वाढताना दिसत आहे. युध्दाच्या पाचव्या दिवशी रशियाने रॉकेटसह क्रुझ क्षेपणास्त्रांच्या केलेल्या मार्यामुळे युक्रेनमध्ये हाहाकार माजला आहे. ( Russia-Ukraine War News ) राजधानी कीव्ह शहरातील ६४ किलोमीटर परिसर रशियन सैन्याची व्यापल्याचे सॅटेलाईट फोटोमधून स्पष्ट झाले आहे. साेमवारी संयुक्त राष्ट्राच्या ( युनो) आपत्तकालीन बैठकीवेळी युक्रेनचे संयुक्त राष्ट्रातील राजदुतांनी एका रशियन सैनिकाने आपल्या आईला पाठवलेला मेसेज वाचून दाखवला.
युक्रेनविरोधात लढणार्या रशियन सैनिकाने आपल्या आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "आई, मी सध्या युक्रेनमध्ये आहे. येथे आता खर्या अर्थाने युध्द सुरु झाले आहे. मला खूप भीती वाटतेय. अनेक शहरांमध्ये एकाचवेळी बॉम्बचा वर्षाव होत आहे. आम्ही युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले करत आहोत".
तुला एखादे पासर्ल पाठवता येईल का, असा मेसेज आईने या सैनिकाला पाठवला. त्यावर उत्तर देताना त्याने म्हटलं की , "आम्हाला सांगण्यात आले होते की, युक्रेनमध्ये आमचे स्वागत केले जाईल. मात्र येथील नागरिक स्वत:ला रणगाड्याखाली झोकून देत आहेत. ते आम्हाला फॅस्सिट संबांधित आहे. आई, हे सार काही खूपच कठीण आहे. मला गळफास घ्यावासा वाटतोय, असेही या सैनिकाने आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं असल्याचे युक्रेनच्या राजदुतांनी युनाेमध्ये सांगितले.
रशियन सैनिकांनी युक्रेन सोडून आपला जीव चाचवावा, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी केले होते. युध्दात रशियाचे ४ हजार ५०० सैनिक ठार झाले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
हेही वाचलं का?