Latest

Malati Chahar : दीपक चहरच्या बहिणीने आपल्या अदांनी केले अनेकांना बोल्ड; पहा तीचे ‘ते’ फोटो

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चहरची ओळख आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात नावलौकिक मिळवलेल्या दीपक चहरप्रमाणे त्याची बहीण मालती चहर (Malati Chahar) देखील तिच्या भावाप्रमाणेच सतत चर्चेत राहते. मालतीने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, जो लोकांना खूप आवडला. व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या मालतीचे इंस्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मालती चहरने (Malati Chahar) 2017 मध्ये 'मॅनिक्योर' चित्रपटातून पदार्पण केले. तसेच, तिने 'जिनियस' आणि 'हुश' या चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या वर्षी तिचा 'इश्क पश्मिना' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

मालतीने याआधी 'दे दे प्यार दे', 'वेल्लापंती' आणि 'ए.आय. SHA:माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड सारख्या चित्रपटात काम केले आहे.

२०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज टीमच्या सामन्यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून तिला  'आयपीएलची मिस्ट्री गर्ल' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर काही काळानंतर ती दीपक चहरची बहीण असल्याचे समोर आले. मात्र, तेव्हापासून ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे.

दीपक चहरची बहिण आहे हे समजल्यानंतर मालतीला अगदी कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळाली. याच दरम्यान तिचे फॉलोअर्स अचानक वाढले होते. चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल टीमची ती चाहती आहे.

मालती सध्या बॉलीवूडमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT