Latest

मोबाईल वापरल्याने ८९ रशियन सैनिक भस्मसात; युक्रेनच्या क्षेपणास्त्रांनी घेतला वेध | Mobile Use Enabled Deadly Ukrainian Strike

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन : युद्धभूमीवर एखादी चूक किती महागात पडू शकते याची प्रचिती थेट प्राचीन काळापासून ते आता सुरू असलेल्या रशिया, युक्रेन युद्धातही आली आहे. रशियन सैनिकांनी मोबाईल फोनचा वापर केल्याने ८९ सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. मोबाईलच्या वापरामुळे युक्रेनच्या क्षेपणास्त्रांना रशिया सैनिकांच्या एका तुकडीचा अचूक वेध घेता आला. (Mobile Use Enabled Deadly Ukrainian Strike)

युक्रेनच्या या हल्ल्यात ८९ रशियन सैनिक मारले गेल्याचे रशियाने मान्य केले आहे. तर दुसरीकडे युक्रेनने मृत रशियन सैनिकांची संख्या ४०० असल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनमधील डोनस्टेक प्रांतातील माकिवका येथे ही घटना घडली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैन्याची इतकी मोठी हानी पहिल्यांदाच झाली आहे.

६ क्षेपणास्त्र डागले | Mobile Use Enabled Deadly Ukrainian Strike

रशियाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारीला एका कॉलेजच्या इमारतीवर युक्रेनने ६ क्षेपणास्त्र डागले. यातील २ क्षेपणास्त्र रशियाने पाडले. पण उरलेल्या ४ क्षेपणास्त्रांनी मात्र एका रशियन सैनिक तुकडीचा वेध घेतला. या हल्ल्यात तुकडीचे उपप्रमुख लेफ्टनंट कर्नल बाचुरीनही मृत्युमुखी पडले. अमेरिकेने बनवलेल्या हिमारस रॉकेट सिस्टमवरून हा हल्ला करण्यात आला. रशियन सैनिक मोबाईलचा वापर करत असल्याने त्यांचे स्थान क्षेपणास्त्रांना अचूकरीत्या समजले.

घटनेचा तपास सुरू

"हा हल्ला नेमका कसा घडला याची चौकशी केली जात आहे. मोबाईलच्या वापरावर बंदी असतानाही अनेक सैनिक मोबाईल वापरत होते, त्यातूनच हा हल्ला झाला हे मात्र सुस्पष्ट आहे," असे रशियाने म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल जनरल सर्जी सेवरीयुकोव म्हणाले, "या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई होईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जातील."

ज्या कॉलेजवर क्षेपणास्त्र डागण्यात आले, तेथे मोठ्या संख्येने रशियन सैनिक होते. याशिवाय येथे ठेवण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT