विदर्भ

जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात; ५५७ पदांसाठी नागपूरमध्ये प्रक्रिया

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कर्मचाऱ्याची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. राज्य शासनाने रिक्त पदांच्या जवळपास 80 टक्के पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखविल्याने राज्यभरात विविध विभागात सुमारे 75 हजार पदे भरण्यात येणार आहेत. नागपूर जि.प.मध्येही ५५७ पदे भरण्यात येणार असून शनिवारी जाहिरात प्रसिध्द झाली.

नागपूर जिल्हा परिषदेसाठी २० संवर्गातील ५५७ पदांची ही मेगा पदभरती होणार आहे. यामध्ये आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) ३०८, औषध निर्माण अधिकारी ११, कंत्राटी ग्रामसेवक २६, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (बांधकाम/ग्रा.पा.पुरवठा) २७, कनिष्ठ लेखा अधिकारी २, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक वर्गीय) १०, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) ६, मुख्य सेविका (अंगणवाडी पर्यवेक्षिका) ५, पशुधन पर्यवेक्षक ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २, लघुलेखक (निम्न श्रेणी) १, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक वर्गीय) २, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) २, विस्तार अधिकारी (कृषी) ४, विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २) ९, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे विभाग) ३५, आरोग्य पर्यवेक्षक २, आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्केमधून २० आणि आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र) यातुन ८० अशी ही पदांची संख्या आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांना ५ ते २५ ऑगस्ट याकालावधीत अर्ज सादर करायचे आहेत. यानंतर शासन निममानुसार अर्जांची छाननी करुन पुढील सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जवळपास दोन-तीन महिने चालणार असून निवड झालेल्या पात्र उमेदवारांना त्यांच्या संवर्गानुसार नियुक्ती देण्यात येणार आहे.

.हेही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT