Surge in inflation; Hike in grocery prices destroys beloved sister's budget
पारध, पुढारी वृत्तसेवाः जीवनावश्यक वस्तुंच्या सर्वच भावात विक्रमी वाढ होत असल्याने सरकारच्या लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले आहे. साखर, तूर डाळ, हरभरा डाळ, खाद्यतेल, खोबरे, शेंगदाणे, चहा पावडर तसेच कपडे धुण्याच्या पावडरच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींना महिन्याचा घरखर्च भागवताना कसरत करावी लागत आहे.
सरकार एका हाताने महिलांना लाडकी बहीण योजनेचे १,५०० रुपये देत असतांनाचय दुसऱ्या हाताने स्वयंपाकघरातील जिवनावश्यक वस्तुच्या किंमतीत वाढ करुन तेच पैसे काढून घेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया पारथ बु येथील महिलांनी उपस्थित केला- महिलांनी व्यक्त केली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांवर नियंत्रण आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही महिलांनी केली.
गेल्या काही महिन्यांत साखरेच्या दरात सातत्याने वाढ झाल्याचे महिलांनी सांगितले. मे महिन्यात सुमारे ४१ रुपये किलो असलेली साखर ५ जून रोजी ४४-४५ रुपये, १ जुलै रोजी ४६ ते ४८ रुपये, १ ऑगस्ट रोजी ५१ रुपये, १४ ऑगस्ट रोजी ५२ ते ५५ रुपये, १८ ऑगस्ट रोजी ५८ रुपये आणि १९ ऑगस्ट रोजी ६२ रुपये किलोपर्यंत पोहोचली.
२१ ऑगस्ट रोजी साखरेचा दर ६८ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. चहा आणि स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ झाल्याने घरखर्चावर त्याचा थेट परिणाम होत असल्याची भावना गृहिणींनी व्यक्त केली.
तूर डाळ आणि हरभरा डाळीच्या दरातही गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. तूर डाळ ९० रुपर्यावरून १३० रुपये किलो, तर हरभरा डाळ ५५ रुपयांवरून ८५ रुपये किलो झाली आहे. डाळी हा रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा वापर कमी करणे शक्य नसल्याने वाढत्या दराचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत आहे.- रुचिता तबडे, गृहिणी