विदर्भ

यवतमाळ : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा वीज प्रवाहामुळे मृत्यू

backup backup

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ शहरालगत असलेल्या जामवाडी शिवारात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा वीज प्रवाहामुळे मृत्यू झाला आहे. आज बुधवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्रावण लक्ष्मण गारपगारी (वय ३५), छत्रपती अजाबराव काळे (२५) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहे. हे दोघेही बोरजई येथील रहिवासी आहेत.

याबाबत अधिकची माहिती अशी की, श्रावण गारपगारी आणि छत्रपती काळे हे दोघेही मंगळवारी रात्री नाल्याच्या काठावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. खेकड्याच्या शोधात ते जांबवाडी शिवारापर्यंत पोहोचले. दोघेही रात्र उलटूनही घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी बुधवारी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. दोघेही जांबवाडी शिवारात नाल्याच्या काठावर मृतावस्थेत आढळून आले.

रात्री शेतात वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी वीज प्रवाह कुंपनाच्या तारेत सोडला जातो. याच तारेला स्पर्श होवून दोघांचाही मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लाडखेड पोलिसांकडून वर्तविला जात आहे. श्रावण गारपगारी याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील आहेत. तर छत्रपती काळे याच्या मागे आई, वडील, एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. या घटनेने बोरजई गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT