बिबट हल्ले रोखण्यासाठी आंबेगावात विजेची सोय, वाड्याभोवती मेंढपाळांकडून लख्ख प्रकाश | पुढारी

बिबट हल्ले रोखण्यासाठी आंबेगावात विजेची सोय, वाड्याभोवती मेंढपाळांकडून लख्ख प्रकाश

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: बिबट हल्ले वाढल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धनगर मेंढपाळांमध्ये दहशत पसरली आहे. त्यांनी रात्रीच्या वेळी वाड्याभोवती विजेची सोय करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, नागापूर, शिंगवे, वळती परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. धनगर-मेंढपाळांच्या शेळ्या, मेंढ्यांवर बिबट्यांचे हल्ले देखील वाढले आहे.

नागापूर येथे शनिवारी (दि. 4) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास धनगर मेंढपाळ ज्ञानदेव माने यांच्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात घोडा जागीच मृत्युमुखी पडला. या घटनेच्या अगोदरच्या दिवशी माने यांच्याच वाड्यातील मेंढीचे कोकरू बिबट्याने पळवले होते. दररोजच बिबट्याचे हल्ले वाढू लागल्याने धनगर मेंढपाळांमध्ये कमालीची चिंता पसरली आहे. वाढते बिबट हल्ले रोखण्यासाठी धनगर मेंढपाळांनी आता रात्रीच्या वेळी शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्याभोवती विजेची सोय करण्यास सुरुवात केली आहे. लख्ख प्रकाशामध्ये बिबट्या येत नाही. त्यामुळे त्यांनी ही व्यवस्था केली आहे.

Back to top button