विदर्भ

यवतमाळ : घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार! आमदार ससाने सह अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अमृता चौगुले

उमरखेड, पुढारी वृत्‍तसेवा :  केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण  २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलन व  त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामात  गैरव्यवहार झाल्या प्रकरणी, अखेर सोमवारी उमरखेड पोलीसांनी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान भाजपा आमदार नामदेव ससाने यांच्यासह अकरा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम ५८(२) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता.

परंतु त्यावर ठोस कार्यवाही होत नव्हती. याबाबत तक्रारकर्त्याने दोन वेळा उच्च न्यायलयाच्या नागपुर खंडपिठात धाव घेवुन कार्यवाहीची  मागणी केली होती. न्यायलयाच्या बडग्याने  नगर विकास मंत्रालयाने  अखेर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

आज सोमवारी उशिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीसांनी ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल  केला.  यामध्ये,  माजी नगराध्यक्ष, तथा आमदार नामदेव ससाने, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण,  कंत्राटदार गजानन मोहळे,  फिरोजखान आजाद खान,( मॅकनिक) मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस. तसेच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते,  आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर,  महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे त्याच बरोबर, लेखापाल सुभाष भुते ,आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

बनावट दस्ताऐवज तयार करून सुमारे ६५ लाख रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांचेवर ठेवण्यात आला आहे.याप्रकरणी उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास करून कार्यवाहीची  पुढील दिशा निश्चित केली जाईल अशी माहीती ठाणेदार, अमोल माळवे यांनी, 'पुढारी' शी बोलतांना दिली.

हे ही वाचलं का  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT