विदर्भ

यवतमाळ : पेपर सोडविताना दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

अविनाश सुतार

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : सराव परीक्षेत गणित विषयाचा पेपर सोडविताना इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास बाभूळगाव येथे ही घटना घडली. प्रतीक गजानन थोटे (१६, रा. सरूळ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. बाभूळगाव येथील प्रताप विद्यालयाचा तो विद्यार्थी होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यालयात वेळापत्रकानुसार सध्या दहावीच्या वर्गाची सराव परीक्षा घेतली जात आहे. सोमवारी गणित विषयाचा पेपर होता. पेपर सोडवत असताना प्रतीक अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विद्यार्थी व शिक्षकांनी त्याला बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रतीक हा खो-खो खेळाचा उत्कृष्ट खेळाडू होता. त्याची आई अर्चना थोटे या सरूळ ग्रामपंचायतीच्या सदस्य, तर वडील शेतकरी आहेत. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT