विदर्भ

वाशिम: पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी जनआक्रोश मोर्चा

अविनाश सुतार

वाशिम : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील जोडगव्हान येथील ऊसतोड मजुराच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गोर सेनेचे अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२०) वाशिममध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाला कृषी उत्पन्न बाजार समितीमधून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने गोर सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जोडगव्हान येथील ऊसतोड मजुराच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना ३० डिसेंबरला घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी संथगतीने तपास केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. केवळ एक आरोपीला अटक केली आहे. मात्र, अजूनही दोन आरोपी मोकाट आहेत. त्यांना तत्काळ अटक करून खटला जलदगती कोर्टात चालवावा. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच मुलीच्या कुटुंबाला 30 लाखांची मदत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT