वाशिम

Nitin gadkari: नगरपरिषदेकडे जहर खायला पैसे आहेत का? रस्त्यांच्या दुरवस्थेवर नितीन गडकरी उद्विग्न

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृतसेवा : वाशिम शहरातील सभेला हेलिपॅडवरून येताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागला. याबाबत त्यांनी भर सभेत नाराजी बोलून दाखवली. नगरपालिकडे पैस नाहीत, असे आमदारांनी म्हणताच त्यांच्याकडे जहर खायला पैसे आहेत का ? हे तपासा, असा उद्विग्न प्रश्न गडकरी यांनी केला. (Nitin gadkari)

गडकरी म्हणाले की, मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्याने जात असताना लोक पाहत होते, मला वाटलं ते मला पाहत आहेत. मात्र, ते पाहत होते की खड्यातून गाडी कशी जाते. वाशिम शहरातील बस स्थानक ते सिव्हील लाईनकडे जाणारा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

Nitin gadkari : आमदार खासदारांची केली कान उघाडणी

मी प्रेशर आणून ठेकेदारांकडून काम करून घेतो. मात्र, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका, असे गडकरी यांनी सांगितले.
प्रचारात बॅनर लावणार नाही. राजकारणात खोटं बोलायचं काम मी करत नाही, निवडणुकीत बॅनर लावणार नाही, कोणाला दारू पाजणार नाही, मी पैसे खाऊ घालणार नाही आणि खाणार नाही. फक्त सेवा करत राहणार आहे.

…तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली टाकीन

मी आतापर्यंत ५० लाख कोटी रुपयांपर्यंतची कामे दिली आहेत. पण एकाही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडलेली नाही. मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितले आहे. रस्त्याला तडा गेला, रस्ता खराब झाला, तर बुलडोझर खाली टाकीन. तरुणांच्या हाताला काम नाही, उद्योग, व्यापार व्यवसायात आपल्याला जास्त प्रगती करण्याची गरज आहे. कृषी, ग्रामीण, आरोग्य क्षेत्रात आपल्याला नवीन व्हिजन घेऊन काम करावे लागेल, असे गडकरी म्हणाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT