मानोरा तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने काढलेला मोर्चा  (Pudhari Photo)
वाशिम

Banjara Reservation | मानोरा शहरात पांढरे वादळ : सकल बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा

Washim Morcha | एसटी प्रवर्ग आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोच्या संख्येने समाज बांधव उतरले रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

Banjara community morcha Manora

वाशिम : मानोरा तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्यासाठी आज (दि.१७) काढलेल्या मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा नागरिक सहभागी झाले होते. समाजातील गणमान्यांच्या द्वारे तालुका प्रशासनामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

आदिम लक्षणे असलेल्या मात्र राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारसी त्वरेने लागू करून अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय सहन करीत असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत शहरातील संत सेवालाल महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग महाराज यांचे सह महाराज परिवारातील जवळपास सर्व सदस्य, वीज मंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड, समनक जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.अनिल राठोड, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, गोरसेना, गोरसिकवाडी, राष्ट्रीय बंजारा परिषद आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा समाजातील सर्व पक्षातील पुढारी. चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, शहर व प्रत्येक तांड्यातील जागरूक नागरिक व तरुणांनी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवला.

बंजारा समाजाला आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावे यासंबंधीचे निवेदन तहसीलदार मानोरा यांच्यामार्फत राज्याच्या शासन प्रमुखांना देण्यात आले. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

सामाजिक दृष्ट्या अतिशय माघारलेल्या व नियम व निकषात बसत असल्यामुळे राज्यातील बंजारा समुदायाला राज्य शासनाकडून निश्चितच कुणाही अन्य मागासवर्गीय समाजावर अन्याय न करता आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलली जातील व बंजारा समाजातील ज्या लोकांनी हे आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष केले आहे त्यांच्या संघर्षाचा आदर राज्य शासन नक्कीच करेल असा विश्वास या आंदोलनात सहभागी झालेले आ.बाबूसिंग महाराज यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT