

BJP vs Congress
वाशिम: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी AI प्रणाली चा गैरवापर करून बिहार काँग्रेस पार्टी च्या वतीने अपमानकारक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. याचा भाजपच्या वतीने वाशिम जिल्ह्यात आज (दि.१३) जाहीर निषेध करण्यात आला.
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हा महामंत्री संगीता इंगोले, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा कविता खराट, शहर अध्यक्षा हेमा विसपुते यांच्या नेतृत्वात वाशीम जिल्ह्यात स्थानिक पाटणी चौक येथे काँग्रेसच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वाशीम जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, व सर्व महिला कार्यकर्ते या आंदोलनास उपस्थित होत्या.