वाशिम

Washim accident: भीषण अपघात! उभ्या कंटेनरला कारची जोरदार धडक; चालक जागीच ठार...

आई वडिलांना एकुलता एक मुलगा असलेल्या दीपकच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : मालेगांव शहराजवळील अकोला नांदेड महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंप समोर हा भीषण अपघात झाला. वाशिमवरून मालेगाव मार्गे शिरपूर जाणाऱ्या एका स्विफ्ट कारची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कार चालक जागीच ठार झाला आहे. सदर अपघात सोमवारी (दि. २७ जुलै) पहाटे ३:०० वाजता घडला आहे.

अपघातग्रस्त एम. एच. ३७ वी. ९८४० या कारच्या जोरदार धडकेत कारचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर कार चालक हा कारमध्ये अडकून होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्याचा मृतदेह कारमधून बाहेर काढला. मृतक दीपक लक्ष्मण भांदुर्गे ( वय ३१ वर्षे रा. शिरपूर जैन ) हे लग्न समारंभ आटोपून शिरपूरला जात असताना ही दुर्घटना घडली.

दीपक भांदुर्गे हे घरातील कर्ते होते. आई वडिलांना एकुलता एक मुलगा असलेल्या दीपकच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे ट्रक उभे राहत असल्याने अशा अनेक अपघाताच्या घटना घडत असतांनाही पोलिस आणि परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT