Washim Accident | कुपटा घाटात टिप्पर-कारची भीषण धडक; मानोरा येथील दोन व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू

अमरावतीकडे जात असताना कारला समोरून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने दुर्घटना
Kupta Ghat  Tipper Car Collision
मानोरा येथील दोन व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यूPudhari
Published on
Updated on

Kupta Ghat Tipper Car Collision

वाशीम : वाशीम जिल्ह्यातील कुपटा घाटात शनिवारी (दि.४) सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. व्यापाराच्या निमित्ताने अमरावतीकडे जात असताना त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मानोरा शहरासह व्यापारी वर्गात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये सुफियान कादर लघा (वय २५) आणि इम्रान जरीब शेख (वय २९, दोघे रा. मानोरा) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुफियान लघा हे रेडिमेड कपड्यांचे, तर इम्रान शेख हे जनरल स्टोअर्सचे व्यावसायिक होते. दुकानासाठी नवीन माल खरेदी करण्यासाठी दोघेही शनिवारी सकाळी कारने अमरावतीकडे निघाले होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कुपटा गावाजवळील घाटात समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

Kupta Ghat  Tipper Car Collision
Washim Car Accident | भरधाव कारच्या धडकेत ७ वर्षीय मुलीचा मृत्यू; आठवडी बाजारातून आजोबासोबत घरी येताना अपघात

धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातात दोघे कारमध्येच गंभीररीत्या अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. कारमध्ये अडकलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही करण्यात आली.

अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या टिप्परचालक उत्तम तिरमाळे (रा. उल्लासवाडी, ता. पुसद) याला पोलिसांनी तातडीने अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news