Washim Accident | वाशिमजवळ दुभाजक ओलांडून खासगी बस दुकानांमध्ये घुसली, केबिनमध्ये लोखंडी रॉड घुसले

रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध बाजूला गेली
Private Bus Crash Washim
कारंजाकडून वाशिमच्या दिशेने येणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसला वाशिम शहराजवळ भीषण अपघात झालाPudhari
Published on
Updated on

Private Bus Crash Washim

वाशिम : कारंजाकडून वाशिमच्या दिशेने येणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसला वाशिम शहराजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, खुराणा ट्रॅव्हल्सची बस अत्यंत भरधाव वेगात होती. रेल्वे उड्डाणपुलाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून थेट विरुद्ध बाजूला गेली. रस्त्याच्या कडेला असलेली चिकन, मटण आणि पानपट्टीची टिन पत्र्यांची दुकाने चिरडत ही बस रस्त्याखाली उतरली. बसचा वेग इतका प्रचंड होता की, या धडकेत तीन-चार दुकानांचा अक्षरशः चुराडा झाला असून जीवित हानी टळली आहे.

Private Bus Crash Washim
Washim Accident | रिसोड - मालेगाव मार्गावर टायर फुटून भीषण अपघात: १ जण ठार, १४ जण जखमी

ड्रायव्हर केबिनमध्ये लोखंडी रॉड घुसले

काही प्रवासी गंभीर असण्याची शक्यता आहे.अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाच्या काचा पूर्णपणे फुटल्या. दुकानांचे लोखंडी रॉड, पत्रे आणि लाकडी बल्ल्या काचा फोडून थेट ड्रायव्हर केबिनमध्ये घुसल्या. यामुळे केबिनमध्ये बसलेले प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news