वाशिम

वाशिम: किन्हीराजा येथे दुचाकीची ट्रकला धडक; बापलेक ठार, एक गंभीर जखमी

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे संभाजीनगर – नागपूर रोडवर दुचाकीने नादुरूस्त ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने बापलेक जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्री १२ च्या सुमारास किन्हीराजा येथील शिवाजी शाळेजवळ घडली. या अपघातात नवलचंद धर्माजी वाघमारे (वय ५५), आशिष नवलचंद वाघमारे (वय ३३, दोघेही रा. कानगाव, ता. हिंगणघाट, जि.वर्धा) ठार झाले. तर दादाराव सखाराम निकम (वय 26, रा. संभाजीनगर ) गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगर – नागपूर रस्त्यावरील किन्हीराजा येथील शिवाजी शाळेजवळ (एमएच ०४ एफ. यु.९९८३) ट्रक बिघाड झाल्यामुळे उभा केला होता. तर (एम एच २० बी.ई. २३४४) या मोटारसायकलवरून तीन जण संभाजीनगरवरून कानगावकडे निघाले होते. यावेळी मोटरसायकल ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात नवलचंद आणि आशिष जागीच ठार झाले. तर याच मोरसायकलवरील दादाराव निकम गंभीर जखमी झाले असून वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जऊळका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आशिष वाघमारे हा मोटरसायकल चालवीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT