वाशिम: नगर परिषदेच्या थकबाकीदार गाळेधारकांवर धडक कारवाई | पुढारी

वाशिम: नगर परिषदेच्या थकबाकीदार गाळेधारकांवर धडक कारवाई

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: अकोला नाका येथील थकबाकी असलेल्या वाशिम नगर परिषदेच्या गाळे धारकांवर मुख्याधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या आदेशाने आज (दि.१९) कारवाई करण्यात आली.

लिलावाद्वारे उपरोक्त व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप गाळे धारकांना करण्यात आले होते. त्यातील १९४ गाळ्यांपैकी ४७ गाळेधारकांनी अग्रिम भरून उर्वरित अधिमूल्य रक्कम पूर्ण भरली नव्हती. त्या गाळेधारकांवर कारवाई करत त्यांचे गाळे सील करण्यात आले.

ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा प्रशासन अधिकारी निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली मोहीम पथक प्रमुख शहर अभियंता अशोक अग्रवाल यांच्या पथकाने केली. मुख्याधिकारी बासुर यांनी गाळे धारकांना तत्काळ शिल्लक अधिमूल्य रकमेचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा 

Back to top button