Bribery Case  Pudhari
वाशिम

Washim bribery case : पाच हजाराची लाच स्वीकारताना लघु पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता जाळ्यात

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख ८०० रुपये, ॲपल कंपनीचा आयफोन आणि ५ हजार रुपये लाच रक्कम समाविष्ट आहे

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशिम : कौलखेड गावठाण पुनर्वसन प्रस्तावासाठी शिफारस पत्र देण्याच्या मोबदल्यात वीस हजारांची लाच मागण्यात आली होती. त्यातील पाच हजारांची लाच स्वीकारताना लघु पाटबंधारे विभागाच्या वर्ग-१ च्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. हेमंत दगाजी चव्हाण (वय ५६, रा. एनडीए रोड, पंढरीनाथ कॉम्प्लेक्स, शिवने, पुणे-२३) असे लाचखोर कार्यकारी अभियंत्याचे नाव असून, ते वाशिम येथील लघु पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत.

घटना अशी आहे की, तक्रारदार यांच्या मौजे कौलखेड गावाचे पुनर्वसन सन २००५ ते २००६ दरम्यान लघु पाटबंधारे विभाग, बोरखेडी (ता. रिसोड, जि. वाशिम) प्रकल्पांतर्गत झाले होते. नवीन ठिकाणी गाव स्थलांतरित करताना प्रत्येक कुटुंबाला एक प्लॉट वाटप करण्याची तरतूद आहे. मात्र, तक्रारदार आणि त्यांच्या गावातील इतर पाच लोकांना प्लॉट मिळाला नव्हता. हा प्रश्न सोडवण्यासाठी तक्रारदार यांनी १७ जुलै २०२६ रोजी कार्यकारी अभियंता हेमंत चव्हाण यांना भेटून उर्वरित प्लॉट मिळण्याबाबत अर्ज दिला. त्यावेळी चव्हाण यांनी, शिल्लक प्लॉट वाटपासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे शिफारस पत्र सादर केल्याचे सांगत मोबदला म्हणून ३० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २२ जुलै २०२६ रोजी वाशिम एसीबी कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीने ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरवले होते. आज, २२ जुलै २०२६ रोजी सापळा कारवाई दरम्यान पैशांची अडचण असल्याचे सांगत तक्रारदार यांनी पाच हजार रुपये हजर केले. यावेळी आरोपी हेमंत चव्हाण यांनी पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि उर्वरित रकमेची देखील मागणी केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.

या प्रकरणातील घटक ACB वाशिम हे आहेत. आरोपी हेमंत दगाजी चव्हाण हे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, वाशिम (वर्ग १) येथे आहेत. तडजोडीअंती २० हजार रुपये ठरले होते आणि पंचासमक्ष ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्यात आली. जप्त मुद्देमालामध्ये रोख ८०० रुपये, ॲपल कंपनीचा आयफोन आणि ५ हजार रुपये लाच रक्कम समाविष्ट आहे. आरोपीचे पुणे येथील घर बंद असल्याने ते सीलबंद करण्यात आले असून धुळे येथील घरझडतीची कारवाई सुरू आहे.

वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. सदर यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चे पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी आणि पोलीस निरीक्षक श्रीमती सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सापळा कारवाईमध्ये पोलीस हवालदार विनोद मारकंडे, पोलीस हवालदार आसिफ शेख आणि पोलीस शिपाई महेश परमेश्वरे यांनी सहभाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT