Washim labor market: "पोटासाठी राबतोय... कोणी काम देता का काम..." वाशीममध्ये भरतो 'कामगारांचा बाजार'

वाशीम शहरातील स्थानिक पाटणी चौक येथे दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत मजूर आणि ठेकेदार एकत्र येतात.
Washim labor market
Washim labor marketpudhari photo
Published on
Updated on

Washim labor market

वाशीम (अजय ढवळे):

वाशीम शहरातील स्थानिक पाटणी चौक येथे दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत मजूर आणि ठेकेदार एकत्र येतात. या चौकात बांधकाम, रंगकाम, सुतारकाम, गवंडी, प्लंबिंग तसेच इतर दैनंदिन मजुरी करणारे शेकडो कामगार रोजगाराच्या आशेने पहाटेपासूनच उभे असतात.

Washim labor market
Washim crime: अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ४ हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसमाला रंगेहात पकडले

कामाची गरज असलेले ठेकेदार व मालक येथे येऊन आवश्यकतेनुसार कामगारांची निवड करतात. काम मिळाल्यास मजुरांचा दिवस सुरळीत सुरू होतो; मात्र काम न मिळाल्यास अनेकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागते. वाढती बेरोजगारी, असंघटित क्षेत्रातील अस्थिरता आणि निश्चित मजुरीचा अभाव यामुळे या मजुरांना दररोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या ठिकाणी कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची, बसण्यासाठी सावलीची आणि स्वच्छतागृहांची मोठी कमतरता असल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असल्या, तरी त्यांचा लाभ प्रत्यक्ष मजुरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.

रोजगाराच्या शोधात दररोज भरणारा हा 'कामगारांचा बाजार' अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार बनला आहे. मात्र, या श्रमिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासनाने अधिक ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Washim labor market
Farmer news : पावसाचा खंड...! या कालावधीत पिकांची शास्त्रीय पद्धतीने काळजी घ्यावी; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news