Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आयशरची ब्रेकडाऊन ट्रकला धडक file photo
वाशिम

Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आयशरची ब्रेकडाऊन ट्रकला धडक

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Horrific Accident on Samruddhi Expressway: Eicher Crashes into Broken-Down Truck

वाशिम : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गावरील कारंजा उपकेंद्र हद्दीत चॅनल क्रमांक २१६, मुंबई कॉरिडॉर येथे २२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात घडला. ब्रेकडाऊन अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला मागून आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात आयशर चालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक CG-17 LD-7178 हा महामार्गाच्या लेनमध्ये ब्रेकडाऊन झाल्यामुळे उभा होता. त्याचवेळी नागपूरहून मुंबईकडे जात असलेला आयशर (क्रमांक MH-15 EG-3549) या ट्रकला मागून धडकला. या धडकेत आयशर चालक आनंद जहाक (वय ३२) गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र अमानी येथील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हेड कॉन्स्टेबल पाचपिले, पोलिस कॉन्स्टेबल बोडखे यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला तातडीने ॲम्बुलन्सद्वारे शेलू बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक हा ८० च्या लेनमध्ये उभा असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे तात्काळ बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT