Yavatmal Accident : कार-ट्रकची धडक; भीषण अपघातात ६ महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू

Yavatmal Accident : कार-ट्रकची धडक; भीषण अपघातात ६ महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू
Published on
Updated on

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील साखरा (खु.) येथे मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. कार आणि ट्रकच्या भीषण समोरासमोर झालेल्या धडकेत ६ महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

उत्सवाचा आनंद विरला; बापलेकीचा अंत

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील आदिलाबाद येथील रहिवासी साईकिरण गोडगुल्ला (वय ३०) हे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त साखरा येथील नातेवाईक सिद्धार्थ रामटेके यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. दिवसभर उत्सवाचा आनंद साजरा करून रात्री ८ वाजेच्या सुमारास ते आपल्या कारने (क्रमांक TG 03 B 7524) परत जाण्यास निघाले.

साखरा गावालगत असलेल्या आश्रमशाळेजवळील वळणावर त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक KA 01 MG 3987) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन निखळून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात साईकिरण गोडगुल्ला आणि त्यांची सहा महिन्यांची मुलगी हंशिका गोडगुल्ला या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

आईची प्रकृती चिंताजनक

साईकिरण यांच्या पत्नी अनुष्का गोडगुल्ला (वय २५) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनुष्का यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या भीषण अपघातामुळे साखरा परिसरात आणि गोडगुल्ला परिवारावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news