पिक-अप - मोटारसायकल अपघातात आई - बाबासह १२ वर्षीय मुलगा ठार File Photo
वाशिम

पिक-अप - मोटारसायकल अपघातात आई - बाबासह १२ वर्षीय मुलगा ठार

या अपघातात मोटारसायकलचा जागीच चुराडा झाला.

पुढारी वृत्तसेवा

12-Year-Old Boy Killed Along with Parents in Pickup-Motorcycle Accident

वाशिम : अजय ढवळे

भरधाव वेगाने येणार्‍या पीकअप वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वाशीम- मंगरुळनाथ रोडवरील पार्डी टकमोर फाट्यावर घडली. या अपघाताची तीव्रता येवढी मोठी होती की, मोटारसायकलचा जागीच चुराडा झाला.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार वाशीम तालुयातील वारा जहागीर येथील रहिवासी संतोष लांभाडे (वय ४०) पत्नी कलावतीबाई लांभाडे (वय ३५) व मुलगा ईश्वर लांभाडे (वय १२) वर्षे हे वारा येथून पार्डी टकमोर येथे नातेवाईकांकडे आले होते.

वारा येथे परत जाताना पार्डी टकमोर फाट्यावर चौफुलीवरून समोर जात असताना मंगरुळनाथकडून येणारे पीकअप हे वाहन मोटार सायकल चालवत असलेल्या संतोष लांभाडे यांना दिसले नाही. परिणामी मोटारसायकलला पीकअप वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात संतोष लांभाडे, पत्नी कलावती लांभाडे व मुलगा ईश्वर लांभाडे हे पती - पत्नी व मुलगा जागीच ठार झाले. धडक देणार्‍या पीकअप वाहनाच्या चालकाने वाहन सुसाट वेगाने वाशीमकडे नेले.

अपघाताच्या आवाजाने पार्डी टकमोर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, या अपघातात तिघेही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वारा जहागीर येथे होताच गावात एकच शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT