Arrested 
वर्धा

Gold chain snatching wardha: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावुन नेणाऱ्या अट्टल आरोपीच्या आवळल्या मुसक्या

या प्रकरणी तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी दोन लाख 64 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिंगणघाट पोलिसांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट येथील मनोज सिंघवी यांची आई इंदुमती सिंघवी (वय ७४) या मॉर्निग वाक करीत होत्या. त्यावेळी अनोळखी इसमाने मोटर सायकलने मागुन येवुन इंदुमती शिंगवी यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची चैन (की. 68,000 रू.) जबरीने हिसकावुन पळुन गेला. या प्रकरणी तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

सदर मिळालेल्या गुप्त माहितीवरून हा गृुन्हा नेरी दुर्गापुर चंद्रपुर येथील राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग रामसिंग टाक (वय ४०) याने केला असल्याची खात्री झाली. त्यास चंद्रपुर येथुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची माहिती पुढे आली. चंद्रपुर येथील सराफा दुकानात ऐवज विकल्याचे सांगितले. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली दुचाकी, दुकानदार यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या उद्यापासून तयार केलेला  2,14,400 रुपये किमतीचा ऐवज असा २ लाख ६४ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीने विचारपूस दरम्यान त्याने भंडारा जिल्हयात अशाच प्रकारचे दोन वयोवृध्द व्यक्तींच्या गळयातील सोनसाखळया जबरीने हिसकावून नेल्याची माहिती पुढे आली आहे.

ही कारवाई सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक अनिल राउत यांचे आदेशाने गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा.नरेंद्र डहाके, पो.ना नरेंद्र आरेकर, पो.ना. निलेषसिंग सुर्यवंषी, पो.काँ. सागर सांगोले, पोकाँ. दिपक मस्के, पोकाँ. अनंत हराळ यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा नरेंद्र डहाके करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT