Wardha News | वर्धा पोलिसांच्या ‘वॉशआऊट’ मोहिमेत अवैध दारुसह १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल जप्त! 

Liquor seizure |
प्रातिनिधक छायाचित्रPudhari Photo
Published on
Updated on

वर्धा : जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने नियोजनबद्ध 'वॉशआऊट' मोहीम राबविली. या कारवाईत जिल्ह्यात ३३ अवैध देशी, विदेशी दारू विक्रीचे गुन्हे तसेच १२९ गावठी दारू विक्रीचे असे १६२ गुन्हे दाखल करण्यात आले. सुमारे १ कोटी ४० लाख ६६ हजार १९० रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

रूपोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. गावठी दारूभट्टीची ठिकाणे आणि देशी विदेशी दारूची विक्री करण्याच्या ठिकाणावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत १६९ आरोपींवर १६२ गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४७ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण ३१५ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. 

अचानक केलेल्या 'वॉशआऊट 'मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news