वर्धा

वर्ध्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

backup backup
वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्ध्यासह विविध भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसाने जनजीवन प्रभावीत झाले. जवळपास अर्धा तास पावसाने तुफान बॅटींग केली.  वर्धा शहरासोबतच विविध भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी आकाशात ढग दाटून आले. पावसाला सुरूवात होताच रस्त्याने फिरणारे नागरिक पावसापासून संरक्षणासाठी रस्त्याच्या कडेला थांबले.
पावसासोबत विजांचा कडकडाट धडकी भरविणारा ठरत होता. विजांच्या कडकडाटात झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन प्रभावीत झाले. सण, उत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित आहेत. त्यामुळे आवागमन करणार्‍यांची संख्या मोठी आहे. पावसामुळे आवागमन करणार्‍ यांची तारांबळ उडाली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT