वर्धा; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या वेळेस विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोंधळ घालत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे.
सम्मेलनाच्या समारोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत असताना कुठलाही गैरप्रकार नको या दृष्टीने पोलीस यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय निर्माण करायचाच नव्हता, संमेलनाध्यक्षाच्या भाषणात आम्ही जाब विचारणार होतो, या संमेलनात विदर्भाचा ठराव करावा अशी आमची मागणी होती अशी भूमिका या विदर्भवाद्यांनी बोलून दाखवली. या संदर्भातील पत्र आम्ही 10 जानेवारी रोजीच विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला दिले होते. अशी माहिती विदर्भवादी आंदोलनकर्त्यांनी दिली.
या आंदोलनातील ज्या विदर्भवादी नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडून देण्यात आले. त्यामध्ये अरुण केदार, प्रा.प्रभाकर कोंडबतुनवार, मुकेश मासुरकर, सुदाम राठोड, नरेश निमजे, गणेश शर्मा,प्यारू भाई, नौशाद हुसैन, ज्योती खांडेकर,जया चतुरकर, माधुरी चौहान,हरिभाऊ पानघोडे, राजेंद्र सतई, विजय मौदेकर, शोएब अहमद यांचा समावेश आहे.
हेही वाचा