नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवा व्हेरीयंट (Corona variant) असलेल्या बीए-५ (BA 5) प्रकारचे दोन रुग्ण आढळले आहेत.
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) प्रयोगशाळेतील जनुकीय चाचणीत हा नवीन विषाणूचा (Corona variant) प्रकार आढळून आला आहे. बीए-५ विषाणूची बाधा झालेल्या दोन्ही रूग्णांचा बाहेरगावच्या प्रवासाचा इतिहास आहे. यातील २९ वर्षीय पुरुष हा केरळहून ४ जूनला नागपुरात आला होता. तर दुसरी ५४ वर्षीय महिला ही मुंबईहून ६ जूनला नागपुरात परतली होती. दोघांनाही सर्दी, खोकला, तापासह इतर लक्षणे असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांना कोरोनाचे निदान झाल्यावर त्यांचे नमुने महापालिकेने जनुकीय चाचणीसाठी नीरीच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.
या दोन्ही रुग्णांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन्ही रुग्णाची माहिती घेतली असता त्यांचे लसीकरण झाले होते. सध्या त्यांना एकही लक्षणे नसून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आहे. खबरदारी म्हणून दोघांना विलगीकरणात राहण्याच्या सुचना करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?