विदर्भ

चंद्रपूर: ट्रॅक्टर अपघातात दोघा मजुरांचा जागीच मृत्यू; २ जण जखमी

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : विजेचे सिंमेटचे खांब नेताना अनियंत्रित होऊन ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरवर बसलेल्या दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१९) मुल तालुक्यातील पिपरी दीक्षित गावाजवळ घडली. मिथून पांडुरंग मराठे (वय 35), अंकुश राजू गंध श्रीवार (वय 36) असे मृत मजुराचे नाव आहे. तर सुभाष रणदिवे (वय 34), ईश्वर मांडवकर (वय 37, सर्व रा. केळझर, ता. मूल) हे जखमी झाले.

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित जवळील भजाळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज डीपी लावण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सिमेंट खांब ट्रॅक्टरच्या साह्याने पिपरी दीक्षितवरून आणताना काही अंतर गेल्यानंतर पिपरीजवळ ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातामध्ये मिथून मराठे, अंकुश श्रीवार या दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष रणदिवे, ईश्वर मांडवकर हे जखमी झाले. या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT